ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
महाराष्ट्र रक्षक पुरस्काराने ओसरगांव शाळा नं.१ सन्मानित..!

महाराष्ट्र रक्षक पुरस्काराने ओसरगांव शाळा नं.१ सन्मानित..!

प्रकाशन: 02 Sep 2022 08:27 PM
वाचन संख्या 100

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
जिल्हा परिषद शाळा ओसरगांव नंबर १ यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन प्रकट महाराष्ट्र या साप्ताहिकाने महाराष्ट्र रक्षक पुरस्कार देऊन शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम यांना सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन कणकवली येथे सन्मानित केले.यावेळी तहसीलदार रमेश पवार, कणकवलीचे पीएसआय सचिन हुंदळेकर, तसेच विद्याधर राणे, ट्रेड युनियन नेते जेष्ठ पत्रकार अंधारी, संपादक दत्तराम दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
सन http://localhost/news/public/uploads/2021 / http://localhost/news/public/uploads/2022 या वर्षांमध्ये कोरोना कालावधीत केलेले काम तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विलास परब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ साहित्यिक कवी अजय कांडर यांची शाळेतील मुलांनी घेतलेली मुलाखत , सिने अभिनेत्री अक्षता कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चला सुसंवाद घडवूया महिला मेळावा आयोजित केला होता. तसेच राज्यस्तरीय निबंध आणि कविता लेखन स्पर्धेमध्ये मुलांनी चांगल्या प्रकारचे सुयश प्राप्त केलं.

शाळेतील मुलांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या उपस्थितीत देशभक्तीपर नृत्य सादर करून स्वागत केले.असे विविधरंगी उपक्रम शताब्दी महोत्सवां नंतर शाळेने राबविले होते. शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम, राजश्री तांबे विलिस चोडणेकर, मोडक यांचे शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले. या शाळेच्या यशामध्ये सर्व विद्यार्थी ,शिक्षक, पालक शाळा व्यवस्थापन समिती, व माजी विद्यार्थी संघ यांचे मोलाचे योगदान आहे असे मुख्याध्यापक किशोर कदम म्हणाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स