ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
शिक्षण प्रसारक श्री.सत्यवान रेडकर यांनी केला सायली कवठणकर यांचा सत्कार.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिक्षण प्रसारक श्री.सत्यवान रेडकर यांनी केला सायली कवठणकर यांचा सत्कार.

प्रकाशन: 02 Sep 2022 08:13 PM
वाचन संख्या 77

तिमिरातूनी तेजाकडे चळवळीचे प्रणेते आहेत सत्यवान रेडकर.

मालवण | सुयोग पंडित : ग्रामीण भागातील विद्यार्थी हळूहळू शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागले आहेत. पारंपारिक अभ्यासक्रमांसोबत व्यावसायिक अभ्यासक्रमात सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वर्णी लागत आहे. मु. पो. कवठणी (बोरभाटवाडी), ता. सिंधुदुर्ग, जि. सावंतवाडी मधील ग्रामस्थ श्री. शामसुंदर कवठणकर यांची कन्या सायली शामसुंदर कवठणकर यांनी एलएलबी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, शिक्षण प्रसारक, श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांच्यामार्फत शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थी अशाच प्रकारे व्यावसायिक अभ्यासक्रमात सुद्धा पुढे येऊन आपल्या गावाचे नाव व कुटुंबाचे नाव मोठे करतील व खासकरून सायली कवठणकर यांनी घेतलेल्या शैक्षणिक मेहनतीमुळे त्यांनी मिळवलेले यश येत्या भविष्यात कायदा क्षेत्रामध्ये उज्वल करिअरच्या अनुषंगाने उपयुक्त ठरेल. प्रशासकीय स्वराज्य निर्माण होण्याच्या हेतूने त्यांचे सुद्धा योगदान समाजाला प्राप्त होईल” असे प्रतिपादन माननीय श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांच्यामार्फत करण्यात आले.
यावेळी तिमिरातूनी तेजाकडे संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन यशवंत रेडकर व कवठणकर कुटुंबीय उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स