ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकाला अटक..!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकाला अटक..!

प्रकाशन: 31 Aug 2022 12:12 PM
वाचन संख्या 156

एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले येथे गोव्यातून कुडाळच्या दिशेने होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत विदेशी मद्याच्या ४२० बाटल्या व बिअरचे १२० टीन अशी एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांची दारु जप्त करण्यात आली. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली ३ लाख रुपयांची स्विफ्ट कार (एमएच ०४ जीई ९०९८) असा एकूण ५ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.     

बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी श्रीकृष्ण सुभाष कदम (३२, रा. हुमरमळा ,अणाव, ता. कुडाळ) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई कोल्हापूर विभागीय आयुक्त बी. एच. तडवी यांच्या आदेशान्वये निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, काँस्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर करीत आहेत.
बेकायदेशीर दारु वाहतूक प्रकरणातील कारवाईची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकरणे दुर्मिळ असल्याने जिल्ह्यातील या युवकाला अटक झाल्याने थोडी खळबळ उडाली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स