ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
शहापूर तालुक्यात महिलांसाठी कोकण कला व विकास संस्थेने केले रोजगार निर्मिती स्कूल.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शहापूर तालुक्यात महिलांसाठी कोकण कला व विकास संस्थेने केले रोजगार निर्मिती स्कूल.

प्रकाशन: 31 Aug 2022 11:46 AM
वाचन संख्या 58

इन्स्टिट्यूशनल शेअर होल्डर्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सी एस आर च्या माध्यमातून मदत.

बांदा | राकेश परब : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील अनेक गावांत मोफत शिलाई प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक पुढील भाग म्हणून महिलांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून देणे हे असून त्यासाठी या महिलांना ३ वेगवेगळ्या प्रकारे उत्पादनाचे साधन निर्माण करून देण्याचा मानस संस्थेचा होता. त्यासंदर्भात आय एस एस कंपनीला मदतीचे आवाहन केले होते.
काल वाशिंद येथे कोकण व विकास संस्था व आय एस. एस. कंपनीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने शिलाई स्कुलचे उद्घाटन करण्यात आले.

या स्कूलच्या माध्यमातून ५० महिलांना रोजगार प्रशिक्षण,प्रत्येकी शिलाई मशीन, ३ प्रकारचे रोजगार निर्मिती प्रशिक्षण, साधन आणि पुढील १वर्ष व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून कमीतकमी २५ गावात शिलाई स्कुल सुरू करण्यात येणार असून या महिलांच्या स्वतःच्या गावात व्यवसाय निर्मितीचे साधन उपलब्ध होणार आहे. या स्कूलची सुरुवात करण्यात आली. सर्व महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली. कोकण संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर प्रीती पांगे यांनी जमलेल्या महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या व्यवस्थापक तारा सांगळे यांनी तर आभार प्रशालेचे शिक्षिका स्नेहल मोरे यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स