ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाजपा नेते डाॅ.निलेश राणे यांचे असंख्य प्रवाशांनी मानले आभार.

भाजपा नेते डाॅ.निलेश राणे यांचे असंख्य प्रवाशांनी मानले आभार.

प्रकाशन: 31 Aug 2022 09:58 AM
वाचन संख्या 82

कुडाळ दादर भाजपा एक्सप्रेस कुडाळत दाखल..!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : माजी खासदार आणि भाजपा प्रदेश सचिव डाॅ. निलेश राणे यांनी गणेश चतुर्थी निमित्त मुंबईतील चाकरमान्यांसाठी विशेष गणेशोत्सव रेल्वे प्रवास ही प्रथमच भाजपा एक्सप्रेस सर्वसामान्य कोकणी चाकरमान्यांसाठी सर्वांच्या सेवेसाठी दाखल केली आहे. डाॅ. निलेश राणे यांनी जे आयोजन केले आहे ते खरोखरच चांगले आहे. निलेश राणे यांनी जी सुविधा भाजपच्या माध्यमातून निर्माण करून दिली त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत असे उद्गार सर्वसामान्य चाकरमानी यांनी आज कुडाळ येथे रात्री दाखल झालेली भाजपा एक्सप्रेस मधील प्रवासी यांनी व्यक्त केले. कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सर्व प्रवाशांचे स्वागत केले व भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेशजी राणे यांच्या माध्यमातून गणेश चतुर्थी निमित्त सर्व चाकरमान्यांना शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विनायक राणे,दादा साईल, जिल्हा बँक संचालक बाबा परब,युवा नेते आनंद शिरवलकर,जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्या तवटे,नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, सरचिटणीस देवेंद्र सामंत,राजवीर पाटील,राकेश नेमळेकर,स्वरूप वाळके,सागर राणे,योगेश घाडी,विघ्नेश घाडी,प्रितेश गुरव आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स