ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
<em>'आपले गुरुजी ' वर्गात फोटो लावण्याच्या निर्णयाला शिक्षक भारतीचा तीव्र विरोध..!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>'आपले गुरुजी ' वर्गात फोटो लावण्याच्या निर्णयाला शिक्षक भारतीचा तीव्र विरोध..!</em>

प्रकाशन: 29 Aug 2022 04:23 PM
वाचन संख्या 47

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
“आपले गुरुजी” या नावाने संबंधित शिक्षकांचा फोटो वर्गामध्ये प्रदर्शित करणेबाबत, शिक्षण आयुक्तांनी सुचना देऊन कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत.या शासनाच्या निर्णयाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी तीव्र विरोध केला असून. शासनाचा या कृतीतून शिक्षकांचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची तीव्र भावना त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे.

दिनांक २४/०८/२०२२ च्या व्हि.सी मध्ये आयुक्तांनी “आपले गुरुजी” या नावाने संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये सन्मानपूर्वक प्रदर्शित करणेबाबत सूचना दिल्या आहेत. या संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली असून दोन आठवडयात याबाबत पूर्तता करावी. व संबंधित शिक्षणाधिकारी यांनी पडताळणी करुन अहवाल सादर करावा असे शालेय शिक्षण सचिव यांनी निर्देश दिले आहेत. कोल्हापूर विभागातील विविध जिल्हयातील अधिनस्त असणाऱ्या सर्व शाळांमध्ये वरील विषयाबाबत कार्यवाही झाली किंवा कसे याबाबत समक्ष शाळांना भेट देऊन कार्यवाहीचा अहवाल शासनास, संचालनालयास व या कार्यालयास अवगत करावा. विलंब होणार नाही यांची दक्षता घ्यावी असेही दिनांक २५ ऑगस्टला शिक्षक उपसंचालक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना काढलेल्या पत्रात नमूद आहे.

यात नमूद केल्याप्रमाणे शिक्षकांचा ए-४ साईज रंगीत फोटो वर्गात लावणे म्हणजे हास्यास्पद असून, विद्यार्थी आणि शिक्षकांचे अतुट नाते असते.शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा संबंधित शिक्षकांना ओळखत असतो तरीही ‘आपले गुरूजी’ म्हणुन वर्गात फोटो लावून शासन कशासाठी उठाठेव करतंय? असा प्रश्न जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी विचारला आहे. ते पुढे म्हणतात की, एखाद्या विद्यार्थ्याकडून वर्गातील या फोटोची विटंबना होण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला जबाबदार कोण?असा सवाल ही शिक्षक भारतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. शिक्षकांवर अन्याय करणारा निर्णय त्वरित रद्द करावा अन्यथा शिक्षक भारतीला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही सिंधुदुर्ग शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स