ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शालेय क्रीडा स्पर्धा लवकरच सुरु करणार - क्रीडामंत्री गिरीश महाजन.

शालेय क्रीडा स्पर्धा लवकरच सुरु करणार - क्रीडामंत्री गिरीश महाजन.

प्रकाशन: 29 Aug 2022 04:15 PM
वाचन संख्या 119

शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघास दिले आश्वासन…!

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
कोरोना काळात सुरक्षेचा उपाय म्हणून शालेय क्रीडा स्पर्धांना स्थगिती होती. मी शालेय जीवनापासून स्वतः खेळाडू असून खेळाडू हित लक्षात घेता शालेय क्रीडा स्पर्धा या झाल्याच पाहिजेत.

त्यामुळे तात्काळ शालेय क्रीडा स्पर्धा या सुरु करणार व या बाबत याच आठवड्यात निर्णय घेतला जाईल असे मत क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महामंडळाचे शिष्टमंडळाने क्रीडामंत्री यांची भेट घेतली त्या वेळी ते बोलत होते, अशी माहिती राज्य कोअर कमिटी सदस्य तथा जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण,राज्य युवा सचिव दिनेश म्हाडगूत यांनी दिली.

मध्यंतरीच्या काळात रखडलेले खातेवाटप नंतर विधीमंडळाचे अधिवेशन यामुळे शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी मिळण्यास उशीर होत होता.स्कूल गेम फेडररेशन ऑफ इंडिया मध्ये दोन गट पडल्याने केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना स्थगिती दिली होती. मात्र क्रीडामंत्री यांच्या उपस्थितीत दोन्ही गटाच्या सदस्यांची ॲडहॉक कमिटी स्थापन करण्यात आली असून उशीरने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार असल्याचे कळते.

त्या धर्तीवर राज्यात शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी देऊन स्पर्धा पार पाडण्यात याव्यात अशी विनंती डॉ. प्रदिप तळवलकर, राजेश जाधव, कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, डॉ .रणजित पाटील, प्रा. हरिश शेळके, प्रा .ईकबाल मिर्झा, गिरीश पाटील,डॉ.क्षितीज भालेराव, डॉ. आसिफ खान, विलास पाटील, प्रविण पाटील, प्रेम खोडपे, डी. के.चौधरी आदींनी मंत्री महोदयांना केली. राज्य संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मंत्री महोदयांच्या कार्यालयाशी संपर्क करून निवेदन सादर केले आहे .

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडूंसाठी बंद असल्याने खेळाडूंच्या करीअर वर परिणाम होऊ शकतो. प्राविण्याला मिळणारे नोकरीतील आरक्षण, अकरावी प्रवेश कोटा, ग्रेस गुण, राष्ट्रीय शिष्यवृत्ती या पासून खेळाडू वंचित राहू शकतात. स्पर्धा सुरु करून लाखो खेळाडूंच्या राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या स्वप्नांना भरारी द्यावी.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स