कणकवलीत खळबळ..; आढळला अनोळखी मृतदेह…!
कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहर बसस्थानकासमोर, बाळा सावंत यांच्या हॉटेलनजीक अंदाजे ६५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी रात्री २.४५ वा. सुमारास उघडकीस आली.
सदरचा ज्येष्ठ रविवारी दुपारनंतर या परिसरात दिसला होता. रात्री उशिरा त्याच्या शरीराची काहीच हालचाल न दिसल्याने एकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तो मयत स्थितीत आढळला. मयत गहुवर्णी असून चेहरा गोल, अंगात निळ्या रंगाचे, उभ्या रेषा असलेले फुलशर्ट, राखाडी फुलपँट आहे. मयता कुणी ओळखत असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी (०२३६७- २३२०३३) केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)