३८ व्या युवा वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय काव्यप्रभा काव्यसंमेलन संपन्न..!
गोपुरी आश्रमात आयोजीत कार्यक्रम.
संवेदनशील साहित्यिका सरिता पवार आणि बाॅलिवुड अभिनेत्री अक्षता कांबळींची विशेष उपस्थिती.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘अनुभव शिक्षा केंद्र आणि कणकवलीतील साद टीम’ यांच्या संयुक्त आयोजनाने जिल्हास्तरीय ‘ काव्यप्रभा’ हे काव्यसंमेलन उत्तम पणे पार पडलं ,यावेळी कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संवेदनशील साहित्यिका व कवियत्री सरिता पवार उपस्थित होत्या ,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा राजेंद्र मुंबरकर आणि बाॅलिवुड अभिनेत्री अक्षता कांबळी उपस्थीत होत्या.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कै. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन केले गेले.
त्यांनतर सर्व मान्यवरांना साद टीमचे श्रेयस शिंदे आणि सहकाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
उपस्थित मान्यवरांनी सर्व कवींना मार्गदर्शन केले तसेच सर्व कवींनी आपल्या स्वरचित कविता वाचून दाखवल्या ,उपस्थित सर्व कवींना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जनजागृती समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरफणकर उपस्थित होते.
तजांचे उद्बोधक मार्गदर्शन व काव्य सादरीकरण या दोन घटकांबद्दल उपस्थित सर्वांनी या काव्यप्रभा आयोजनाच प्रशंसा केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)