ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>शिरगांव क्रिकेट स्पर्धेत डि आर सी सी देवगड संघ विजयी होऊन पटकावला भाजप चषक..!</em>

<em>शिरगांव क्रिकेट स्पर्धेत डि आर सी सी देवगड संघ विजयी होऊन पटकावला भाजप चषक..!</em>

प्रकाशन: 24 Aug 2022 03:41 PM
वाचन संख्या 105

संदीप साटम मित्र मंडळाचे आयोजन..!

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम मित्र मंडळाने आयोजित केलेल्या पावसाळी रबर बॉल भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत
डि आर सी सी देवगड संघ विजयी होऊन त्यांनी भाजप चषक पटकावला आहे.

देवगड तालुक्यातील शिरगांव येथील श्री पावणाई मंदिर नजीक असलेल्या मैदानात दोन दिवस चाललेल्या क्रिकेट स्पर्धेत २४ संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात डिआर सी सी देवगड यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांना ११ हजार १११ रुपये रोख व भाजप चषक देऊन गौरविण्यात आले तसेच नांदगाव क्रिकेट संघाने द्वितीय क्रमांक मिळवला त्यांना ७ हजार ७७७रुपये रोख व भाजप चषक देऊन गौरविण्यात आले.

बक्षीस वितरण प्रसंगी माजी प्राचार्य विजय कदम जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम युवा मोर्चाचे देवगड तालुका अध्यक्ष अमित साटम, पुरुषोत्तम साटम, हडपीड सरपंच दाजी राणे, आसिफ कादरी ,प्रशांत शिरगांवकर ,पोलिस ॲकॅडमीचे प्रशिक्षक राजेंद्र शेट्ये,सुंदर पवार, नितीन घाडी आदी उपस्थित होते.

तसेच उत्कृष्ट फलंदाज वेदांत जाधव , उत्कृष्ट गोलंदाज अमीर बटवाले , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अवि देवगडकर, मालिकावीर प्रकाश पराडकर यांनाही बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

तसेच मयूर स्पोर्ट्स यांच्याकडून खेळाडूंना टि शर्ट देण्यात आली.
या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ओमकार तावडे ,आनंद परब , सोनु मोंडकर , युध्दीराज राणे, प्रथमेश जाधव ,आदित्य चव्हाण, मंगेश साटम, अजय घाडी, विनोद सरफरे यांनी विशेष मेहनत घेतली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स