भाजपा युवा मोर्चाचे नेते संदीप गुप्ता यांचे सरकार व मुंबई म.न.पा.ला आवाहन…!
मालवण | सुयोग पंडित : भाजप युवा मोर्चा कलिना क्षेत्राचे अध्यक्ष संदीप गुप्ता यांनी सरकार व मुंबई मनपा चे एका आरोग्यविषयक गोष्टीकडे लक्ष वेधून घेतले आहे.
मुंबई सायन इस्पितळातल्या अस्थीरोग उपचार तथा ऑर्थोपेडीक विभागामध्ये एक्स रे,सोनोग्राफी व एम.आर.आय. चाचणी करायला येणार्या रुग्णांना व त्यांच्या सोबत येणार्यांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे संदीप गुप्ता यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
ऑर्थोपेडीक वाॅर्ड असणार्या इमारतीमध्येच या एक्स रे ,सोनोग्राफी व एम.आर.आय. चाचणी सुविधा उपलब्ध झाल्यास रुग्णांची हेळसांड थांबेल आणि सोबत येणार्यांचाही त्रास कमी होईल असा उपाय संदीप गुप्ता यांनी सरकार,मुंबई मनपा व हाॅस्पिटलचे प्रबंधक (डीन) यांना सुचविला आहे.
यावर लवकरात लवकर विचार व्हावा असे भा.ज.यु.मो. कलीना क्षेत्राचे अध्यक्ष संदीप गुप्ता यांनी संबंधित सर्व यंत्रणांना डिजिटल निवेदनाद्वारे आवाहन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)