ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>कुडाळ सिंधुदुर्गच्या राजाची नियोजन बैठक संपन्न..!</em>

<em>कुडाळ सिंधुदुर्गच्या राजाची नियोजन बैठक संपन्न..!</em>

प्रकाशन: 23 Aug 2022 03:07 PM
वाचन संख्या 62

29 ऑगस्टला सकाळी ठीक 10 वाजता पिंगुळी इथून सिंधुदुर्ग राजाचे सभा मंडपात होणार आगमन…!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
आज कुडाळ येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून स्थापन होणारा प्रतिवर्षी “सिंधुदुर्गचा राजा” गणेश उत्सवानिमित्त कुडाळ भाजप कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपस्थित विनायक राणे,आनंद शिरवलकर, बंड्या सावंत, राकेश कांदे, राकेश नेमळेकर, गणेश भोगटे, निलेश परब, राजवीर पाटील, आदिती सावंत, विनायक घाडी आदी उपस्थित होते.

सोमवार 29 ऑगस्टला सिंधुदुर्ग राजाची मूर्ती वाजत गाजत कुडाळ येथे सभा मंडपात दाखल होणार होणार आहे सकाळी 10 वाजता पिंगुळी माडये गणेश मूर्ती केंद्र येथून आणण्यात येणार आहे. गणेश चतुर्थी दिवशी सकाळी ठीक 10 वाजता विधिवत पूजन करण्यात येणार आहे.

तसेच गणेश उत्सव कालावधीत डबलबारी दशावतारी नाटक फुगडी तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसेच अनेक सर्व मंडळे संस्था शासकीय कार्यालय यांच्या प्रतिनिधींना महाआरतीवेळी सहभागी करून घेण्याचे ठरवण्यात आले आहे. नवव्या दिवशी श्री सत्यनारायण महापूजा व दुपारी महाप्रसाद यांचे आयोजन केलेले आहे तरी असंख्य गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स