पंचायत समिती देवगड कडून विनायक धुरी यांचा सत्कार..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यात चित्ररथाद्वारे हर घर तिरंगा बाबत यशस्वीपणे प्रचार प्रसिद्धी केल्याबद्दल तसेच पाणी व स्वच्छता विभागात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल जि.प बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेंद्र महाले यांच्या हस्ते पाणी व स्वच्छता विभागाचे विनायक धुरी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले . यावेळी व्यासपिठावर गटविकास अधिकारी अरूण चव्हाण , नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकुर , पोलीस निरीक्षक निळ्कंठ बगळे, उपनिरीक्षक दशरथ चव्हाण , देवगड पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोद्धा प्रसाद गांवकर , माजी सभापती सुनिल पारकर, माजी पंस सदस्य श्रीम . अपूर्वा तावडे , आदी मान्यवर उपस्थित होते .
सिंधुदूर्ग जिल्ह्यात लक्षवेदी ठरलेला चित्ररथाद्वारे देवगड तालुक्यात यशस्वी प्रचार प्रसिद्धी केल्याबद्दल पंचायत समिती देवगड द्वारे विनायक धुरी यांचा सन्मान करण्यात आला ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगाबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात आली . गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या चित्ररथाची निर्मिती झाली होती . तर सडा शाळेचे शिक्षक सचिन जाधव यांच्या कल्पकतेतुन या रथाची मांडणी झाली होती तर त्याला मोलाच सहकार्य कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी केल होत .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)