सैनिक नागरी पतसंस्था शिरगांव शाखेत QR कोडचे मान्यवरांचे हस्ते मोफत वितरण..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सैनिक नागरी पतसंस्थेने उत्कृष्ठ जिल्हा संस्था पुरस्कार प्राप्त केला असून आज शिरगांव शाखेत QR कोड चे मान्यवरांच्या हस्ते मोफत वितरण करण्यात आले.
या संस्थेच्या माध्यमातून RTAS, NEFT, ATM या सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधा बरोबरच आता या QR कोड ची देखील सुविधा सुरू करण्यात आली. सैनिक पतसंस्थेच्या या सुरक्षित QR कोड चा फायदा व्यापारीवर्गाबरोबर इतरही सामान्य ग्राहकांना होणार आहे. ही सुविधा पूर्णतः मोफत असणार आहे. या सुविधांचा जास्तीत जास्त ग्राहकांनी फायदा घ्यावा असे आवाहन सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी केले.
यावेळी सैनिक पतसंस्थेच्या सर्व सुविधा बाबत डेव्हलपमेंट ऑफिसर मयूर गवळी यांनी ग्राहकांना सविस्तर माहिती दिली. यावेळी ग्राहकांमधून या सुविधेचे स्वागत आणि समाधान व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला शाखाव्यवस्थापक राजेश सावंत यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी डेव्हलपमेंट ऑफिसर मयूर गवळी, शिरगांव शाखाव्यवस्थापक राजेश सावंत, देवगड तालुका व्यापारी संघाचे उपाध्यक्ष सुधीर साटम, शिरगांव व्यापारी संघाचे अध्यक्ष अजित उर्फ दादा पारकर, सचिव शरद साटम, शिवसेना शाखाप्रमुख रघुनाथ साटम, नंदकुमार जोईल,नितीन घाडी, लिपिक दमयंती राणे, तुषार चव्हाण, सौ. रेश्मा साटम, सिध्दी इंदप, पूजा साटम, कुलदीपक घाडीगावकर, विशाल साटम, राजेश शिरोडकर,शीतल तावडे, ममता वाळके, रविकांत जोगळे आदींसह ग्राहकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)