अभिनव उद्योग प्रबोधिनी म्हणजे व्यावसायिक,व्यावहारिक सुवर्णसंधी..! ( संपादकीय)
मालवण | संपादकीय : अभिनव नांव ऐकले किंवा हा शब्द ऐकला की ‘अचूक ऑलिंपिअन अभिनव बिंद्रा’ आठवतो आणि आपसूकच सुवर्णपदकाची छबी डोळ्यासमोर तरळते.
गेले काही महिने सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील अभिनव उद्योग प्रबोधिनीने किंवा टीम अभिनवनेदेखिल असेच काहीसे सुवर्ण स्वप्न पाहिले आहे…फक्त फरक इतकाच की या अभिनव उद्योग प्रबोधिनीने ते स्वप्न वैयक्तिक पाहिलेले नसून व्यापक तथा सामाजिक स्तरावर पाहिलेले आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी, विविध व्यवसाय संधी माहित करुन देण्यासाठी अनेक उपक्रम अभिनव उद्योग प्रबोधिनी राबवत आहे.
या उपक्रमाचेच एक पुढचे मंगल पाऊल म्हणजे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यावसायिकांचे कुडाळ येथे आयोजीत केले गेलेले भव्य शॉपिंग प्रदर्शन..!
26-27-28-29 ऑगस्ट असे चार दिवस चालणारे हे प्रदर्शन ‘सिद्धिविनायक हॉल’, कुडाळ येथे संपन्न होत आहे.
या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणजेच स्थानिक व्यावसायिक स्टॉल लावणार आहेत.
गेली तीन दशके सिंधुदुर्ग जिल्ह्याच नव्हे तर जवळपास देशातील प्रत्येक जिल्हा सणासुदीच्या वस्तूंपासून ते अत्यावश्यक मालापर्यंत परकीय उत्पादनांकडे आकर्षीत झाला होते. त्याचे आर्थिक फटके स्थानिक बाधवांनी म्हणजे आपण स्वतः सोसल्यानंतर आज असे अभिनव पाऊल ही काळाची अत्यावश्यक गरज बनलेलीच आहे .
अभिनव उद्योग प्रबोधिनीने एक गोष्ट सर्वांना दाखवून दिलेली आहे की सोशल मिडिया ही संशोधनाची व सर्व्हे करायचा मंच नसून कृतींच्या थेट प्रदर्शनाचा संच आहे.
विमानात बसल्यावर एक सूचना केली जाते की आपत्कालीन स्थितीत आधी स्वतःला वाचवुया तरच आपण इतरांना वाचवायची पुण्याची सुवर्णसंधी मिळवू शकतो.
अभिनव उद्योग प्रबोधिनीने हाच संदेश थेट कृतीतून करु दिला आहे. आपण शक्य असेल तितक्या क्षमतेने या प्रकल्पातून खरेदी करण्याचा प्रयत्न नक्कीच करु शकतो. कुडाळ हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसे मध्यवर्ती असल्याने ‘एखादा दिवस खरेदीचा….एखादा दिवस अभिनवच्या भरारीचा’ आपण नक्कीच काढू शकू ही आशा.
सुयोग पंडित ( संस्थापक व मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल )
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)