श्री नवलराज विजयसिंह काळे यांच्या संकल्पनेतून 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी दहा वाजता सडूरे होणार भव्य आरोग्य शिबीर…!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग,
ग्रामीण आरोग्य फाउंडेशन सिंधुदुर्ग, कै. नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय व हिंद लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सदस्य श्री.नवलराज विजयसिंह काळे आयोजित डोळे तपासणी (मोतीबिंदू) तपासणी व रक्त तपासणी शिबिर(मोतीबिंदू असल्यास त्याची शस्त्रक्रिया असे भव्य शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.
ब्लड प्रेशर सहित खालील सर्व रक्त तपासण्या देखील तिथे मोफत होणार आहेत.CBC (हिमोग्लोबिन तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी प्लेटलेट व इतर) HbA1c (शुगर तीन महिन्याचा कंट्रोल टेस्ट), T3,T4,TSH (थायरॉईड टेस्ट) Ca 19 (कॅन्सर टेस्ट),Calcium (कॅल्शियम टेस्ट) Sugar Random (शुगर-ग्लुकोमीटरवर), HB Electrophoresis अशा टेस्ट संपूर्ण मोफत होणार असून या आरोग्य शिबिरामध्ये सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)