ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांबूतोडीचा आधार..सणासुदीचा तारणहार..! (विशेष)

बांबूतोडीचा आधार..सणासुदीचा तारणहार..! (विशेष)

प्रकाशन: 23 Aug 2022 12:40 PM
वाचन संख्या 80

ब्युरो रिपोर्ट | मुंबई : सध्या कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बांबू तोडीने जोर घेतला आहे.त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोकणातील शेतकऱ्याला मिळणाऱ्या पैशाचा एकमेव आधार बांबू ठरला आहे.

कोकणातून दिवसेंदिवस बांबूची मागणी वाढतच आहे.ज्याचा घराच्या आसपास बांबूचा बेटी आहेत.त्यांना सणासुदीच्या काळात बांबू विक्रीतून आर्थिक आधार मिळत आहे.सध्या कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बोरबेट,सोन चिवा,माणगा,मानवेल या स्थानिक प्रजातींच्या दर्जेदार बांबूला मोठी मागणी आहे.हे बांबू सांगली, मिरज,लातूर या परिसरात पाठविले जात आहेत.भांडी वळणे,बांधकाम आणि भाजी लागवडीला आधार देण्यासाठी बांबूचा वापर केला जात आहे.स्थानिक व्यापाराचा जिल्हा बाहेरील व्यापाऱ्यांवर विश्वास संपादन झालेला आहे.अशा व्यापाऱ्यांकडे हा बांबू जात आहे.जिल्ह्या बाहेरील नवख्या व्यापाऱ्यांना बांबू दिला जात नाही.त्याला कारणेही अनेक आहेत.
राजापूर,वैभववाडी,कणकवली,कुडाळ,सावंतवाडी या भागात मोठ्या प्रमाणात बांबूची तोड सुरु झाली आहे.या दिवसात बांबू तोडायचे नसतात.नवे कोंब येण्याची प्रक्रिया सुरु असते.तोडताना मोठं नुकसान होत म्हणून काही शेतकरी या दिवसात बांबू तोडायला देत नाहीत.परंतू जे हातघाईवर आले आहेत.ज्याला पैशाची अत्यंत गरज आहे ते कोंबाचे नुकसान होणार नाही या अटीवर व्यापाऱ्यांना बांबू तोडायला देत आहेत.या दिवसात दरही 10 रुपये जास्त मिळतो.

बांबू व्यापाऱ्यांचे असे म्हणणे आहे की,पुढे दिवाळी नंतर बांबूची मागणी कमी होईल.सध्या बांबूला मोठी मागणी आहे.परंतू कोंबाच नुकसान होईल म्हणून काही शेतकरी तोडीला बांबू देत नाहीत.सध्या बाजारात मोठी मागणी असताना जर का आता बांबू तोडायला मिळाले नाहीतर काय उपयोग ? आमचीही रोजी रोटी आहे असं व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

एका मोठ्या 18 फूट लांबीच्या बांबूला कमीत कमी 50 रुपये,त्या पेक्षा 18 फूट लांब बारीक काठीला 25 तर तुकडा बारा फूट बारीक काठीला 12 .50 पैसे भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.तोड करणे,बांबू मालवाहतूक करणे हा खर्च व्यापारी करतात .बांबूचे पैसे दिल्या शिवाय बांबू उचलायचा नाही असा कोकणात अलिखीत नियम आहे. व्यापारी आपलं नाव खराब होऊ नये म्हणून कटाक्षाने नियम पाळतात.राज्यात गेली 50 ते 60 वर्षे कोकणातील स्थानिक प्रजातीच्या बांबूचा दबदबा मार्केट अजून टिकून आहे.त्याला स्पर्धा करणारी बांबूची जात राज्यात अद्याप पुढे आलेली नाही.

परंतु एकंदरच आणिबाणीच्या स्थितीला व खासकरुन सणासुदीला “बांबू तोडीचा आधार हाच कोकणचा ठरतोय तारणहार” ठरतोय.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स