<em>तोरसोळे ग्रामस्थांनी केली श्रमदानातून रस्त्याची डागडुजी..!</em>
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड निपाणी मार्गावरील तोरसोळे फाट्यापासून तोरसोळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्त्याची डागडुजी केली.
देवगड तालुक्यातील तोरसोळे रस्त्यावर पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी असुरक्षित व धोकादायक बनला होता सदर रस्ता हा गणेश चतुर्थी पूर्वी सुस्थितीत व्हावा या दृष्टीने तोरसोळेचे माजी उपसरपंच सुरेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप साटम यांनी भेट देऊन कामाचे कौतुक केले आणि उर्वरित हा रस्ता जिल्हा परिषद च्या माध्यमातून करण्यात येईल असे सांगितले.
या श्रमदान उपक्रमात माजी उपसरपंच सुरेश राणे संतोष पवार अण्णा पवार देवदास पवार अशोक राणे संतोष पवार देवा कदम दिप्ती परब रिया पवार प्रांजल पवार गायत्री पवार गीता पवार आदीसह महिला वर्ग श्रमदानात सहभागी झाला होता.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)