ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>रोटरी क्लब ऑफ बांदा कडून एम.एस.एफ.सी. विषयाची पुस्तके व्ही.एन.नाबर इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना भेट..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>रोटरी क्लब ऑफ बांदा कडून एम.एस.एफ.सी. विषयाची पुस्तके व्ही.एन.नाबर इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना भेट..!</em>

प्रकाशन: 23 Aug 2022 10:50 AM
वाचन संख्या 65

बांदा | राकेश परब :
बांदा रोटरी क्लब, नेहमीच बांदा दशक्रोशीत सामाजिक जाणीवेतून अनेक उपक्रम राबवत आहेत. यामध्ये शैक्षणिक उपक्रमातून त्यांनी येथील व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मधील इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना एम.एस.एफ.सी. विषयातील ऊर्जा व पर्यावरण विभागाची पुस्तके मोफत भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला. या शाळेतील विद्यार्थ्यांची गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ बांदा यांनी हा उपक्रम व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा मध्ये नुकताच घेण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, रो.बाबा काणेकर रो. संदीप देसाई, रो. योगेश परुळेकर, रो.सुधीर शिरसाट प्रशाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, उपस्थित होते.

व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये एम.एस.एफ.सी.सारख्या स्तुत्य उपक्रमातून तंत्र शिक्षण येथील विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यामुळे या प्रशाळेतील विद्यार्थी इंजिनिअरिंग कडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रमोद कामत यांनी व्यक्त केले. रो.बाबा काणेकर म्हणाले आजच्या स्पर्धेच्या युगात एम.एस.एफ.सी. सारखे तंत्र विषय माध्यमिक शाळेतून मुलांना शिकवण्यात यावेत ही खरी काळची गरज असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी तर सुत्रसंचालन विभाग प्रमुख रिना मोरजकर यांनी केले.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत निदेशक भिकाजी गिरप, रिया देसाई, देसाई यांनी केले शेवटी उपस्थितांचे आभार देसाई यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स