माध्यमिक विद्यामंदिर साळशी या प्रशालेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि वह्यांचे वाटप..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
माध्यमिक विद्यामंदिर साळशी या प्रशालेतील ४७ विद्यार्थ्यांना साळशी गावातील दानशूर व्यक्ती बाबू विठ्ठल साळसकर व आनंद गावकर यांच्याकडून देण्यात आलेल्या मोफत गणवेश आणि श्रीकांत गावकर यांच्याकडून देण्यात आलेल्या मोफत वह्यांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच वैभव साळसकर, स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत, माजी पं.स सदस्य सुनील गावकर प्रभाकर साळसकर यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
यावेळी या प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी दानशूर देणगीदारांनी केलेल्या सहकार्याबदल
आभार मानले. यावेळी माजी सरपंच विशाखा साळसकर, संतोष साळसकर, कुलदीप घाडी, मंगेश साळसकर संतोष पवार शिक्षक वर्ग विद्यार्थी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम साटम यांनी केले तर आभार संजय मराठे यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)