कुडाळ वेंगुर्ले स्थानिकांच्या वतीने सा.बां. विभागाला निवेदन.
गणेश चतुर्थीपूर्वी सा.बां.विभागाच्या अखत्यारीतील धोकादायक रस्ते दुरुस्त करण्याची केली मागणी.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ वेंगुर्ले स्थानिकांच्या वतीने आज उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग ,कुडाळ यांना एक प्रातिनिधिक निवेदन देण्यात आले.
गणेश चतुर्थीच्या सणापुर्वी सा.बां.विभागाच्या मालकीच्या राज्यमहामार्ग व जिल्हा महामार्ग यांची तातडीने देखभाल व दुरूस्ती व्हावी अशी या निवेदनात मागणी केली गेली आहे.
कार्यकारी अभियंता सावंतवाडी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कुडाळ कार्यालय असून कुडाळ तालुक्यातील महत्त्वपूर्ण रस्त्यांची देखभाल व दुरूस्ती करण्याची संपूर्ण जबाबदारी नागरीकांची सनद २०११ अन्वये राज्यशासनाने यापूर्वीच विभागाकडे सोपवलेली आहे. सद्यस्थितीत सर्व रस्त्यांची अतिशय दयनीय व गंभीर दुर्दशा झाली असून कोणत्याही क्षणी प्रवास करताना नागरीकांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यावरील खड्डे मोठया प्रमाणात वाढलेले. असून सदरील रस्त्यांवर ज्या कंत्राटदाराने वर्क ऑर्डर प्रमाणे शेवटचे काम केलेले असेल त्या कंत्राटदाराच्या व सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरीकांच्या सहकार्याने तात्काळ सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. तसेच या निवेदनाद्वारे काही प्रमुख मागण्याही खालील प्रमाणे केलेल्या आहेत.
अधिक्षक अभियंता रत्नागिरी,कार्यकारी अभियंता सावंतवाडी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पुढील ४ दिवसांत रस्त्यांबाबतचा जनतादरबार आयोजित करावा.
जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय अपघात निवारण समितीची सभा पुढील ४८ तासात आयोजित करावी.
नागरीकांची सनद २०११ यांस संपूर्ण तालुक्यात व्यापक प्रसिध्दी दयावी.
नोंदणीकृत कंत्राटदार, सर्व शासकीय अधिकारी, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वकील, डॉक्टर व अन्यायग्रस्थ नागरीक यांची संयुक्त सभा तातडीने आयोजित करावी.
बोगस कंत्राटदारांची यादी तयार करून त्यांना काळया यादीमध्ये समाविष्ट करावे व त्यांचा अधिकृत परवाना रद्द करावा.
सद्यस्थितीत रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड झाडी वाढलेली असून त्यामुळे कोणत्याही क्षणी मानवहानी होण्याची शक्यता आहे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजुला गटारांचे काम काही ठिकाणी अर्धवट स्थितीत असून काही ठिकाणी गटारे मारलेलीच नाहीत. सदरील बाग अतिशय गंभीर असून गटारे नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नविन रस्त्याचे काम लवकर खराब होण्याची शक्यता आहे.
काही महिन्यापुर्वीच मठ ते पिंगुळी या रस्त्यावर अनुक्रमे श्री. प्रभू व श्री. सावंत काम केले असून अदयापपर्यंत कामाचा तपशील असलेला बोर्ड कामाच्या सुरूवातीच्या ठिकाणी लावण्यात आलेला नाही.
अशा सर्व मागण्यांचा गांभिर्याने विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा नागरीकांचा उद्रेक झाल्यास, रस्त्यावर अपघात होऊन मानवहानी झाल्यास त्याला आपण सर्व अधिकारी जबाबदार राहणार असा इशाराही या व वेदनाद्वारे दिला गेला आहे.
कुडाळ वेंगुर्ले स्थानिकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात सर्वश्री.नंदन वेंगुर्लेकर,अजित मार्गी,संजय भोगटे, गुरुनाथ दामले,महेश धोंड, दीपक गावडे, श्रीराम शिरसाट या सामाजिक कार्यकर्ते तथा स्थानिक नागरिकांनी हे निवेदन दिले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)