ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आजगाव साहित्य कट्ट्याची बाविसावी सभा संपन्न..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आजगाव साहित्य कट्ट्याची बाविसावी सभा संपन्न..!

प्रकाशन: 22 Aug 2022 09:13 PM
वाचन संख्या 48

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट: ‘मालवणी भाषेत दर्जेदार साहित्य निर्माण व्हावे. ही भाषा सर्वव्यापी व्हावी आणि तिने ज्ञानपीठाला गवसणी घालावी’ ,असा आशावाद कवी विनय सौदागर यानी व्यक्त केला. ते आजगांव वाचनालयातील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या बावीसाव्या सभेत बोलत होते.

‘काव्यभोवताल’ कार्यक्रमांतर्गत त्यानी आपल्या मालवणी कवितेचा प्रवास उलगडून दाखवला. ‘मी सहा वर्षांपूर्वी एका स्पर्धेकरीता पहिली मालवणी कविता लिहिली. नंतर वृत्तपत्रातील सदरामध्ये कविता लिहू लागलो. पुढे सोशल मिडीयातही प्रतिसाद मिळू लागला अन् त्यातून ‘भोवताल’ व ‘सभोवताल ‘ असे दोन काव्यसंग्रह निर्माण झाले. वृत्तपत्राच्याच सहकार्यातून चारोळ्या लिहिल्या. एकंदरीत माझ्या काव्यप्रवासात वृत्तपत्र व पत्रकारांचा वाटा फार मोठा आहे. ‘ असेही त्यानी नमूद केले.
शेवटी ते म्हणाले की,’ ज्या मालवणी कवितेने मला आनंद दिला,नाव दिले ;त्या मालवणी भाषेत चांगले साहित्य निर्माण व्हावे,यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहेन. ‘ कार्यक्रमात कवी सौदागर यानी ‘रंग मुलखाचे’, ‘बारा म्हयन्याचे बारा तर्‍हा’, ‘चार दिसाची चार’, ‘थकललो मालवणी माणूस’, ‘ मराण’ आणि ‘औसार कडकडलो’ या कविताही सादर केल्या.
प्रास्ताविक विनायक उमर्ये यानी केले, तर ईश्वर थडके, सोमा गावडे व स्वप्नील वेंगुर्लेकर यांनी चर्चेत भाग घेतला. प्रकाश कब्रे यानी मालवणीतील काही किस्से सांगितले, तर अनिल निखार्गे यांनी ‘मालवणी भाषेला लिपी नाही,ही उणीव’ हे एका ज्येष्ठ लेखकाचे मत लक्षात आणून दिले.
सभेला रामचंद्र झाटये,विशाल उगवेकर, दत्तगुरू कांबळी, उत्तम भागीत, प्रशांत रेगे, प्रकाश मिशाळ ,एकनाथ शेटकर, प्रिया आजगावकर, अनिता सौदागर, मीरा आपटे,सरोज रेडकर आणि रश्मी आजगांवकर आदी साहित्य प्रेमी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स