ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
जिल्हास्तरीय स्पर्धेतही पंचायत समिती देवगडचा डंका ; समुह गीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत मारली बाजी..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्हास्तरीय स्पर्धेतही पंचायत समिती देवगडचा डंका ; समुह गीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत मारली बाजी..!

प्रकाशन: 20 Aug 2022 06:44 PM
वाचन संख्या 57

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव सांगता समारोह निमित्त जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तर्फे खुला गटातील समूह गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

सिंधुदुर्ग नगरी येथील शरद कृषी भवन येथे ही स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेत पंचायत समिती देवगड प्रभाग देवगड व प्रभाग फणस गाव हे दोन संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत पंचायत समिती देवगड प्रभाग देवगड ने ‘मी भारतीय आहे’ हे गीत सादर करून जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

या यशामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सर्व टीम चे अभिनंदन केले आहे.
स्वराज्य महोत्सवात देवगड तालुक्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबवित संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले असताना जिल्हा स्तरावरील स्पर्धेत सुद्धा आपला ठसा उमटविताना आपल्या सांघिक भावनेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या समूह गीत गायनामध्ये कनिष्ठ सहाय्यक नितीन कोयंडे , दत्तात्रय घाडी विशेष शिक्षक , शिक्षक विकास जांभवडेकर, दळवी शिक्षक,मधुसूदन घोडे , बाल विकास प्रकल्प अधिकारी अक्षता देसाई, मुख्य सेविका पूजा सावंत, शिक्षिका दिपीका पालकर ,राजश्री मोंडकर , वरीष्ठ सहाय्यक स्वप्नाली तुळसुलकर ,पाणी व स्वच्छता तज्ञ वैशाली मेस्त्री , मुख्यसेविका राखी राणे यांनी भाग घेतला. तर ढोलकी साथ विकास नर ,ढोलक साथ दर्षन घाडी यांनी केली. संघ संयोजक म्हणून प्रशासन अधिकारी संतोष बिर्जे यांनी काम पाहिले. तर गाण्याची निवड ,मार्गदर्शन आणि संगीत संयोजन सचिन जाधव यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स