वानिवडे-मोंड व पावणाई-तळवडे या दोन्ही पुलांन संदर्भात मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री,पर्यावरण मंत्री यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन सादर..!
मुंबई | ब्यूरो न्यूज :
देवगड तालुक्यातील वानिवडे-मोंड पूल ५/३/२०१६ अन्वये रु.७२०-०० लक्ष रक्कमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त व पावणाई-तळवडे पूल अर्थसंकल्पीय कामे सन २०२०-२१ मध्ये समाविष्ट असलेले दोन्ही पूल हे कांदळवन प्रजातीची झाडे असल्याने CRZ परवानगी व उच्चन्यायालय घेणं या कारणाने सदर पूल रखडले आहेत.
या करीता श्री.श्रीकृष्ण रघुनाथ धुरी व श्री देव मांडकारी ग्राम उत्कर्ष मंडळ,अध्यक्ष श्री श्रीविद्या सदाशिव सरवणकर यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनात मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,पर्यावरण मंत्री दीपक केसरकर,उद्योग मंत्री उदय सामंत व आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन निवेदन दिले या वेळी सर्वानीच लवकरात लवकर परवानगी मिळवून कामाला सुरुवात होईल असे सांगितले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)