अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कळसुली प्रशालेमध्ये देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा संपन्न...!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या समूह गीत देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक इयत्ता सातवी तर द्वितीय क्रमांक इयत्ता पाचवी तर माध्यमिक उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक इयत्ता अकरावी तर द्वितीय क्रमांक इयत्ता नववी ब यांनी पटकावले .श्री चंद्रशेखर दळवी प्रायोजित घेण्यात आलेल्या स्पर्धकांना रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस वितरित करण्यात आले. या कार्यक्रमांच्या वेळी स्कूल कमिटी चेअरमन श्री के .आर .दळवी सदस्य श्री नामदेव घाडीगावकर श्री अंकुश परब कळसुली शिक्षण संघ कार्यकारणी सदस्य श्री विश्वास दळवी श्री दिलीप दळवी श्री एम.डी. सावंत शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष श्री शिवाजी गुरव सदस्य श्री घाडीगावकर सौ श्वेता दळवी सदस्य शिक्षक पालक संघ इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी या स्पर्धा दर वर्षी प्रशालेमध्ये घेण्यात येतात.या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री ए .पी .पवार यांनी केले तर परीक्षण श्री एस. के. कावले श्री आर्लेकर एस. एल. आणि श्री राणे सी.एम. यांनी पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सावंत ए जी. यांनी केले या कार्यक्रमासाठी वाद्यवृंदा मध्ये हार्मोनियम प्रशालेचे विद्यार्थी हेमंत मेस्त्री रूद्र गुरव ढोलकी वादक वेदांत गोसावी तसेच झांज वादक प्रशांत कासले, शाम लाड इत्यादींची साथ लाभली. यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या वर्ग शिक्षकांचे अभिनंदन संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री वगरे व्ही.व्ही. ज्येष्ठ शिक्षक श्री सावळ एस. के. समस्त शिक्षक-पालक संघ, ग्रामस्थ वर्गातून करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)