ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्याचे चांगले कार्य कणकवली तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने करण्यात आले ही बाब निश्चितच कौतुकास्पद - डॉ.प्राजक्ता तेली.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्याचे चांगले कार्य कणकवली तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने करण्यात आले ही बाब निश्चितच कौतुकास्पद - डॉ.प्राजक्ता तेली.

प्रकाशन: 18 Aug 2022 12:47 PM
वाचन संख्या 50

कणकवली तालुका तेली समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
तेली समाज बांधवांनी एकत्रित येऊन आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी संघटीत झाले पाहिजे.आपल्या तेली समाजातील दहावी,बारावी,पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले आहे.अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्याचे चांगले कार्य कणकवली तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने करण्यात आले ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.असे गौरवोद्गार कणकवली येथील दंतशल्य विशारद डॉ.प्राजक्ता तेली यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने कणकवली येथील हाॅटेल उत्कर्षाच्या सभागृहामध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी डॉ.प्राजक्ता तेली बोलत होत्या.
यावेळी तेली समाजाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण तेली, सचिव परशुराम झगडे,आबा तेली,प्रकाश काळसेकर, नंदकुमार आरोलकर, ग्रामसेवक दत्ताञय तळवडेकर तसेच तालुकाध्यक्ष दत्ताराम हिंदळेकर आदी उपस्थित होते.
सुरुवातीला संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कणकवली तालुक्यामधील तेली समाजातील दहावी, बारावी,पदवी,पदव्युत्तर, गुणवंत विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.तसेच समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रदीप खानविलकर, महेश कोळसुलकर,नंदकुमार आरोलकर,शैलेन्द्र डिचोलकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच लाकडी तेल घाना व्यावसायिक कौस्तुभ तेली याचाही समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी पुढेही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्याच्या दृष्टीने तसेच समाजासाठी विविध विधायक उपक्रम समाजातर्फे राबविण्यात येतील असे सांगितले.तसेच काही गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका उपाध्यक्ष महेश मोंडकर,सचिव अरविंद वायंगणकर,खजिनदार विशाल नेरकर सदस्य सुरेश मालंडकर,भरत तळवडेकर, महादेव तेली,विनोद बंदरकर यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी तालुक्यातील बहुसंख्य गुणवंत विद्यार्थी आणि समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम झगडे यांनी केले.तर शेवटी तालुका सचिव अरविंद वायंगणकर यांनी सर्वांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स