ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये शिक्षक पालक संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये शिक्षक पालक संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड.

प्रकाशन: 18 Aug 2022 12:33 PM
वाचन संख्या 39

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
कळसुली शिक्षण संघ मुंबईच्या कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशालेमध्ये नुकतीच शिक्षक पालक संघाच्या शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. इयत्ता पाचवी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या कळसुली दशक्रोशीतून पालक संघ निवडण्यात आला.
प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक व्ही.व्ही.वगरे यांनी शिक्षक-पालक संघाची उद्दिष्टे व महत्व विशद केले त्याचप्रमाणे शिक्षक पालक संघाचे कार्य आणि शालेय उपक्रमामध्ये सहभाग याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
शिक्षक पालक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक वगरे व्ही.व्ही तर उपाध्यक्ष शिवाजी साबाजी गुरव तर सचिव म्हणून शिक्षकांमधून परुळेकर एस. ए.यांची निवड करण्यात आली व सहसचिव श्वेता श्रीकृष्ण दळवी यांची एकमताने निवड करण्यात आली इतर सदस्यांमध्ये सिताराम शिवराम मेस्त्री ,आनंद रामचंद्र जाधव,राजन बाळाजी सावंत ,सौ.दिप्ती दिनेश सावंत,शिवप्रसाद आत्माराम घाडीगावकर, सौ.नीलम नितीन भोगले, सौ.अमृता आनंद पाडावे सौ.ऋतुजा रमेश तांबे इत्यादीची नवीन कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.शेवटी आभार माजी सचिव आनंद सावंत यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स