ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे 17 ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी शिबिर…!

आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे 17 ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी शिबिर…!

प्रकाशन: 16 Aug 2022 12:40 PM
वाचन संख्या 53

वैभववाडी | प्रतिनिधी :
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी रावराणे चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व बी. के .एल. वालावलकर रुग्णालय,डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर 17 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आनंदीबाई रावराणे विद्यालय वैभववाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात हर्निया,अल्सर,अपेंडिक्स, थायरॉईड,मुळव्याध, मुतखडे, चरबीच्या गाठी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया,पित्ताशयातील खडे, कान,नाक,घसा, शस्त्रक्रिया, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया, आदी शस्त्रक्रिया या शिबिरात होणार आहेत.

शिबिरात सहभागी होणा-या रुग्णांनी मागील आजारांच्या तपासणीचे रिपोर्ट व चालू औषधे घेऊन येणे. सदर शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करण्यायोग्य रुग्ण आढळल्यास केसरी व पिवळ्या रेशन कार्डधारकांसाठी मोफत शस्त्रक्रिया केली जाईल.अधिक माहितीसाठी प्रमोद रावराणे, संजय रावराणे, सुधीर नकाशे, संतोष टक्के, प्रशांत गुळेकर, प्रवीण पेडणेकर,सागर रावराणे, विनायक रावराणे, राजेंद्र राणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स