<em>तालुकास्तरिय निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त मानसी लाड हिला देवगड पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान..!</em>
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा अभियान अंतर्गत देवगड पोलीस स्टेशन ने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षिस वितरण समारंभ पार पडला. या स्पर्धेत आठवी ते दहावी या गटात- माध्यमिक विद्यामंदिर साळशी,ता.देवगड ची विद्यार्थिनी कुमारी मानसी अजय लाड , इयत्ता १० वी ,हिने तालुकास्तरिय या स्पर्धेत निबंध लेखनात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ देवगड पोलीस स्टेशन कडून पार पडला.या समारंभात देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे साहेब यांच्या हस्ते मानसी लाड हिला पारितोषिक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला देवगड हायस्कूल मुख्याध्यापक श्री.राऊत सर,साळशी हायस्कूल चे मुख्याध्यापक माणिक वंजारे सर, देवगड पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी , शिक्षक, विद्यार्थी इत्यादि उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)