गोळवण येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय गोळवण येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्र किर्लोस येथील शास्त्रज्ञ विलास सावंत, पं. स. मालवण चे कृषि अधिकारी आर. जी. कांबळी, बॅ. ना. पै. सेवांगण कट्टाचे कार्यवाहक दिपक भोगटे तसेच गोळवण-कुमामे-डिकवल चे सरपंच सुभाष लाड, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, ग्रामसेवक, ग्रा. पं. कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक-सेविका, तसेच गोळवण, कुमामे व डिकवल गावातील सुमारे १०० ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमात “भारताचे संविधान” याचे सामुहिक वाचन करण्यात आले. तसेच कट्टा येथील श्री. दिपक भोगटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. वय ७५ वर्षांवरील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कृषि विज्ञान केंद्र किर्लोस चे श्री. विलास सावंत यांनी शेतकऱ्यांना कृषि विषयक मार्गदर्शन केले. शेतकरी मेळाव्याचे औचित्य साधून ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)