ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत ठेवा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत ठेवा..!

प्रकाशन: 13 Aug 2022 06:08 PM
वाचन संख्या 90

सौ.शरयू घाडी यांचे मुणगे येथे प्रतिपादन..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
अनेक परकीय आक्रमणे या देशावर झाली परंतु अमृत शक्तीच्या माणसांनी या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. अनेक देशभक्तांच्या त्यागातून, बलीदानातून आजच्या स्वातंत्र्याची आपण फळे चाखत आहोत. आपल्या मनामध्ये सदैव स्वातंत्र्याची, राष्ट्रप्रेमाची भावना जागृत असली पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कालावधीत विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते, युद्ध कथा या पासून प्रेरणा घेऊन देशभक्ती जागृत ठेवावी असे प्रतिपादन जेष्ठ समाजीक कार्यकर्त्या सौ .शरयू घाडी यांनी येथे केले.

देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू .कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे महत्व या विषयी मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. स्वातंत्र्याचा अभिमान प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मनात जागृत ठेवावा असे आवाहन सौ शरयू घाडी यांनी शेवटी केले.

प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज यांनी केले.
यावेळी शिक्षिका सौ गौरी तवटे, प्रसाद बागवे, एन. जि. वीरकर, हरीश महाले, सौ. रश्मी कुमठेकर, प्रणय महाजन, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ मिताली हिर्लेकर, सौ प्रियांका ठाकूर, प्रियांका कासले, स्वप्नील कांदळगावकर, झुंजार पेडणेकर, एन. एल. बागवे, मनोहर कडू, सुरेश नार्वेकर, संतोष मुणगेकर, आदी उपस्थित होते. आभार एन जि वीरकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स