ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सेंद्रिय शेती काळाची गरज ;डॉ.विलास सावंत यांचे प्रतिपादन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सेंद्रिय शेती काळाची गरज ;डॉ.विलास सावंत यांचे प्रतिपादन.

प्रकाशन: 13 Aug 2022 05:40 PM
वाचन संख्या 46

कट्टा येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण संपन्न..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
सध्या भरमसाट रासायनिक खतांचा शेतात वापर होऊ लागल्याने त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. त्यामुळे वेळीच आपणास सेंद्रिय शेतीकडे वळल्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र, किर्लोसचे विषय विशेषज्ञ डॉ.विलास सावंत यांनी येथे केले.

ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व ग्रामपंचायत वरची गुरामवाडी यांच्या संयुक्त‍ विद्यामाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रशिक्षणाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलाने करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी, कृषि पर्यवेक्षक मालवण धनंजय गावडे, कृषि पर्यवेक्षक धामापूर सिताराम परब, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी, कृषि सहाय्यक पवनकुमार सौंगडे, ग्रामपंचायत सदस्या श्रीम. कुबल, माजी सरपंच सतिश वाईरकर, माजी उपसरपंच मकरंद सावंत, ग्रामसेवक एल.डी.सरमळकर, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळद्याच्या कृषिकन्या व शेतकरी वर्ग आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषि सहाय्यक पवनकुमार सौंगडे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स