देवघर (कुर्ली )धरणाचे दरवाजे सायंकाळी ४ वाजता उघडणार ; देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा…!
वैभववाडी | ब्यूरो न्यूज : देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरु असल्याने पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणाच्या व्दारे परीचलनाच्या कार्यक्रमानुसार सध्यस्थितीत दिनांक 1 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 ते 15 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 या कालावधीमध्ये धरणामध्ये तलांक 184.00 मी.पातळीपर्यंत पाणीसाठा करावयचा आहे.
सध्यास्थितीत धरणाची पाणीपतळी 185.00 मी. इतकी झाली असून ती विहित मर्यादेपेंक्षा जास्त झाल्याने व पाऊस सुरु असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे आवश्यकतेनुसार उघडावे लागणार आहेत. यासाठी दि. 13 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सायंकाळी 4 वा. धरणाचे दरवाजे अंदाजे 5 ते 10 सेमी ने उघडण्यात येत आहेत. त्यामुळे नदीपात्रामध्ये पाणी पातळीत वाढण्याची शक्यता आहे.
तरी नदी काठच्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना इशारा देण्यात येतो की, जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरु नये व सावधानता बाळगावी,याची नोंद घ्यावी. असे आवाहन आंबडपाल-कुडाळचे मध्यम प्रकल्प विभागीय पथक, कार्यकारी अभियंता हर्षद यादव यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)