<em>देवगड किल्ल्यावर स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव उत्साहात साजरा ; भारत माता की जय, वंदे मातरम् घोषणांनी देवगड शहर दुमदुमले.</em>
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवगड किल्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य महोत्सवास सर्व देवगड वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ,भारत माता की जय, वंदे मातरम घोषणांनी देवगड शहर दुमदुमले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देवगड किल्ला येथे नुकताच आयोजित केलेल्या स्वराज्य महोत्सवास नागरिक संस्था, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या निमित्त देवगड तहसीलदार कार्यालय ते देवगड किल्ला या मार्गावर विशेष पदयात्रा काढण्यात येऊन त्यात दुचाकी स्वारांची उपस्थिती लक्षणीय होती. ९ ऑगस्टला २०२२ , ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता पदयात्रा मोटारसायकल फेरी तहसील कार्यालय ते देवगड किल्ला पदयात्रा ऐतिहासिक, देवगड किल्ला पर्यंत काढण्यात आली. यामध्ये महिला ढोल पथक, घोषणा तिरंगी फुगे यांनी सारा देवगड परिसर देशभक्तीने न्हाऊन निघाला होता. यामध्ये नागरिकांना भारताच्या नकाशा प्रतिकृती मध्ये तिरंग्यातील तीन रंगाप्रमाणे उभे करण्यात येऊन 11 वाजता देवगड किल्ला येथे राष्ट्रगीताचे समुह गायनाचा कार्यक्रम पार पडला.
या सोहळ्याला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, माजी आमदार अजित गोगटे, देवगड जामसंडे नगराध्यक्षा साक्षी प्रभु, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, सर्व नगरसेवक नगरसेविका, उपमुख्यकार्यकरी अधिकारी तनपुरे, विनायक ठाकूर, उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने, देवगड तहसीलदार मारुती कांबळे, पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, गटविकास अरुण चव्हाण, नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गव्हाणे, गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष निशिकांत साटम, प्राचार्या सुखदा जांबळे, प्राध्यापक, शिक्षक वर्ग,शासकिय कर्मचारी वर्ग व नागरीक उपस्थित होते.
सकाळच्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले, त्यामध्ये शेठ म. ग. हायस्कुल देवगड देश भक्ती गीत, इंग्लीश मिडीयम स्कुल देवगड देश भक्तीपर गीत, देवगड कॉलेज ग्रुप डान्स, आर्ट सर्कल देवगड देश भक्तीपर गीत, मनस्वी घारे देश भक्तीपर गीत तसेच स्वातंत्र्य सैनिकाचे स्मरण म्हणून यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला तसेच महसूल, पोलीस, पंचायत समिती, महाविद्यालय, शाळा, पत्रकार प्रतिनिधीचा सत्कारही करण्यात आला. त्यानंतर तीन रंगातील फुगे हवेत सोडण्यात येवून चित्ररथाचे मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
देवगड मधील सर्व घटक पहिल्यांदाच या उपक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले होते. या उपक्रमांत तहसील कार्यालय देवगड पंचायत समिती देवगड चे सर्व विभाग, देवगड जामसंडे नगरपंचायत, पोलीस स्टेशन देवगड, सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय सर्व विविध संस्था तेथील सर्व कर्मचारी, बार कौन्सिल देवगड, देवगड जामसंडे नगर पंचायत क्षेत्रातील व जवळच्या क्षेत्रातील सर्व प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, तेथील विद्यार्थी एन सी सी, एन एस एस युनिट, होमगार्ड, व्यापारी मंडळ शहर विकास मंडळ ग्रामस्थ मंडळ, क्रीडा मंडळ, महिला मंडळ, सांस्कृतिक मंडळ, बचत गट, रोटरी क्लब, पत्रकार संघ, डॉक्टर्स असोसिएशन, इंजिनिअर्स असोसिएशन सहभागी झाले होते. या उपक्रमात देवगड तालुक्यातील नागरिकांनी, पुरुषांनी सफेद शर्ट पॅन्ट पांढरी टोपी तसेच महिलांनी केशरी किंवा हिरव्या रंगाच्या साड्या परीधान करून उपस्थिती दर्शविली होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)