<em>जामसंडे सन्मित्र मंडळ यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ते १४ ऑगस्टला सेवाभावी उपक्रम तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन..!</em>
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांचे औचित्य साधून जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे तालुका देवगड यांच्या वतीने सेवाभावी उपक्रमांचे आयोजन
जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे यांच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांचे औचित्य साधून सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त शनिवार दिनांक १३ ऑगस्ट २०२२ सकाळी ९.३० वाजता मो.ज.गोगटे सांस्कृतीक भवन जामसंडे येथे जामसंडे सन्मित्र मंडळ आयोजित व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करणेत आले आहे. तरी या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवून रक्तदानासारखे पवित्र दान करावे असे आवाहन मंडळाचे कार्यवाह चंद्रकांत पाटकर यांनी केले आहे.
तसेच मंडळाचे वतीने रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता नलावडे सभागृह. जामसंडे हायस्कूल येथे तालुकास्तरीय शालेय गट (इ. ५ वी ते १० वी) व खुला गट कॅरम स्पर्धेचे आयोजन करणेत आले आहे. शालेय गटासाठी प्रवेश फी रुपये २५/- तर खुल्या गटासाठी प्रवेश फी रुपये ५०/- ठेवणेत आली आहे. शालेय गटासाठी बक्षीसे प्रथम क्रमांक रोख रु. १५००/-, व्दितीय क्रमांक १०००/- आणि तृतीय क्रमांक ५००/- तर खुल्या गटासाठी प्रथम क्रमांक रोख रु. ३०००/- व्दितीय क्रमांक २०००/- आणि तृतीय क्रमांक १०००/- अशी ठेवणेत आली आहेत. या स्पर्धेच्या माहीती व नाव नोंदणीसाठी मंडळाचे पदाधिकारी धिरज बाणे व राजेंद्र बालकर यांचेशी संपर्क साधावा.
तसेच रक्तदान शिबीरीत रक्तदान करणाच्या रक्तदात्यासाठी मंडळाचे हितचिंतक व आधारस्तंभ निरंजन निलकंठ दीक्षित यांचेवतीने त्याचे वडिल कै. निलकंठ श्रीधर दीक्षित यांच्या स्मृती प्रित्यर्थ खास भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच कॅरम स्पर्धेत विशेष प्राविण्य दाखविणाऱ्या स्पर्धकांना विशेष प्रोत्साहनपर बक्षीसे निरंजन निलकंठ दीक्षित यांचेमार्फत देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी तसेच स्पर्धकांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)