ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
भारतीय जनता पार्टी, बांदा तर्फे सावंतवाडी तहसिलदार यांच्या कडे धान्य पुरवठा बाबत निवेदन..!

भारतीय जनता पार्टी, बांदा तर्फे सावंतवाडी तहसिलदार यांच्या कडे धान्य पुरवठा बाबत निवेदन..!

प्रकाशन: 11 Aug 2022 01:50 PM
वाचन संख्या 52

बांदा | राकेश परब :
भारतीय जनता पार्टी, बांदा यांच्या तर्फे मा.सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना प्रत्यक्ष भेटून धान्य पुरवठा करताना लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी निवेदन देण्यात आले. कोकणातील सर्वात महत्वाचा सण गणेश चतुर्थी हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाच्या वेळी धान्य पुरवठा होताना लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेशनिंग दुकानावरील धान्य साठा किमान दहा दिवस अगोदर रेशनधारकाना उपलब्ध करुन द्यावा. त्याचबरोबर देण्यात येणाऱ्या धान्य व तेलाच्या वाटपाच्या प्रमाणात थोडी वाढ करून द्यावी. तसेच रेशनिंग दुकानावरील धान्य साठा आवश्यकतेनुसार उपलब्ध असावा. त्याबाबत आपल्या धान्य पुरवठा विभागाला आपण आवश्यक सूचना द्याव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टी, बांदा यांनी केली.


यावेळी भारतीय जनता पार्टी बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, केदार कणबर्गी, सावंत आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स