ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>तळेबाजार येथे ११ ऑगस्टला वर्षावास पौर्णिमा कार्यक्रम.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>तळेबाजार येथे ११ ऑगस्टला वर्षावास पौर्णिमा कार्यक्रम.</em>

प्रकाशन: 10 Aug 2022 07:18 PM
वाचन संख्या 33

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सर्व धम्मबांधव व भगिनींना कळविण्यात येते कि, देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ-तळेबाजार मुंबई/गावशाखा, महिला सेवा संघ यांच्यावतीने दिनांक ११ ऑगस्टला वर्षावास पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ११ ते दुपारी १ वाजता बुद्ध विहार तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, तळेबाजार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बौध्द धम्माचे अभ्यासक आयु. पी. के. जाधव-फोंडाघाट हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सामुदायिक त्रिसरण, पंचशील तसेच पुजापाठ आदी धार्मिक विधी होतील. त्यानंतर विषय-बौध्द धम्मातील रितीरिवाज व पद्धती तसेच धार्मिक विधी संस्कार पद्धती यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच संघाच्या उपासकांना स्वतंत्र मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी खीरदानाचा कार्यक्रम होणार आहे. तरी आपण सर्वांनी वर्षावास कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आग्रहाचे निमंत्रण देत आहोत.
तसेच संघाच्या सर्व उपासकांनी व नवोदित उपासकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे. त्याचप्रमाणे गावप्रतिनिधी, गाव मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य त्याचप्रमाणे गाव महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष शामसुंदर जाधव,सचिव राजेंद्र मुंबरकर
तसेच कार्यकारीणी पदाधिकारी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स