<em>स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मिठमुंबरी ग्रा. पं. च्या वतीने समुद्र किनाऱ्यावर राबवली स्वच्छ्ता मोहीम.</em>
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त मिठमुंबरी ग्रामपंचायतीच्यावतीने बुधवारी येथील दोन किमी लांबीचा समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किनाऱ्यावर पडलेल्या व वाहून आलेल्या प्लॉस्टीक बाटल्या व अन्य साहित्य यावेळी जमा करण्यात आले. माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वरचे विद्यार्थी व देवगड पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी संपूर्ण गावात हर घर तिरंगा जनजागृतीचा रथ फिरविण्यात आला.
मिठमुंबरी ग्रामपंचायतीच्यावतीने ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी कुणकेश्वर हायस्कूलचे सुमारे ६० विद्यार्थी तर देवगड पंचायत समितीचे सुमारे ३० कर्मचारीवर्ग तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य, बचतगटाचे सदस्य, पूर्ण प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका सहभागी झाले होते. यावेळी मिठमुंबरी सरपंच सौ. रिमा मुंबरकर, सदस्य शंकर गावकर, लक्ष्मी तारी, दक्षता मुंबरकर, ग्रामसेवक रेश्मा गोवळकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सत्यवान गावकर, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, विस्तार अधिकारी निलेश जगताप, अंकुश जंगले, कृषी विस्तार अधिकारी श्री. खराडे, श्री. पायघन, अधिक्षक केदार मांजरेकर, पाणी व स्वच्छता विभागाचे विनायक धुरी, समाजकल्याण विभागाचे विनायक सांगळे, वित्त विभागाचे अविनाश, शिक्षक सचिन जाधव, मुख्याध्यापक मधूसुदन घोडे, शिक्षक संजय राणे, दीपक बाळके, शांतीकांत कदम, स्वयंसेवक सुर्यकांत डामरी, संतोष गावकर, शांती बागवे, बचतगटांच्या प्रमुख समन्वयक सोनाली गावकर, पायल गावकर, काजल गावकर आदी उपस्थित होते. सुमारे २ किमी लांबीचा समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. रिमा मुंबरकर यांनी स्वच्छता मोहीमेत सहभागी सर्वांचे स्वागत केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमातंर्गत मंगळवारी येथील पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये गावातील सुमारे ७० जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. मुंबरकर, उपसरपंच दयाळ गावकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सत्यवान गावकर, सामाजिक कार्यकर्ते नरेश डामरी, उमेश तारी, माजी उपसरपंच सौ. तारी, मधुकर तोडणकर, शाळा समितीचे अध्यक्ष हेमंत तोडणकर, ग्रामसेवक श्रीमती गोवळकर तसेच ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)