ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>ध्वज संहितेचे पालन करून 'घरोघरी तिरंगा' उत्साहात साजरा करा - के.मंजुलक्ष्मी</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>ध्वज संहितेचे पालन करून 'घरोघरी तिरंगा' उत्साहात साजरा करा - के.मंजुलक्ष्मी</em>

प्रकाशन: 10 Aug 2022 06:54 PM
वाचन संख्या 83

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. त्या निमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे. याच महोत्सवाचा भाग म्हणून आजपासून स्वराज्य महोत्सव होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत ध्वज संहितेचे पालन करून घरोघरी तिरंगा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.

घरोघरी तिरंगा उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी दररोज ध्वज खाली उतरवण्याची आवश्यकता नाही. मात्र शासकीय कार्यालयांना ध्वज संहितेचे पालन करून ध्वज दररोज उतरवावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या मार्फत ग्रामीण भागासाठी नियोजन करण्यात आले असून नागरी भागासाठी नगर परिषद, नगर पंचायती नियोजन करत आहेत. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला त्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. लवकरच प्राधिकरणासाठी ध्वज वितरण केंद्र मुख्यालय स्तरावर सुरू होत आहे, असे सांगून पोलीस बँड पथक आणि ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम कलाकारांचे कौतुक करून जिल्हाधिकारी यांनी आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स