ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
स्वातंत्र्याच्या साक्षीदारांनी गायले राष्ट्रगीत..!

स्वातंत्र्याच्या साक्षीदारांनी गायले राष्ट्रगीत..!

प्रकाशन: 10 Aug 2022 01:36 PM
वाचन संख्या 78

श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट ,आणि बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांचा उपक्रम.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट , मुंबई आणि बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताची पंचाहत्तर वर्षे पाहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील नामांकित व्यक्तिमत्वांनी स्वतःच्या आवाजात राष्ट्रगीत सादर करून भारतीय स्वातंत्र्याप्रति आपली भावना व्यक्त केली. बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ याचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून आजवर या संस्थेचे देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे.

ही मूळ संकल्पना श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुमित पाटील यांची असून हा उपक्रम चलचित्र स्वरूपात आपल्याला पहायला मिळणार आहे. या उपक्रमाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायादिग्दर्शक पराग पाटील यांनी केले असून याचे संकलन अमोघ सागवेकर यांनी केले आहे. मालवण येथील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक शिवहरी रानडे यांनी सांगीतिक साथसंगत केली आहे.

या उपक्रमासाठी बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळच्या पुढील सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. श्री. काशिनाथ आत्माराम सामंत, (८३ वर्ष ) श्री. अरविंद रामचंद्र शिरसाट,( ७८ वर्ष) श्री. सुरेश परशुराम ऊर्फ बापु नाईक, (८२ वर्ष) श्री. चंद्रकांत कृष्णाजी ऊर्फ चंदु शिरसाट, (७७ वर्ष) श्री. कमलाकर महादेव इन्सुलकर, (७६ वर्ष ) श्री. शरद वासुदेव ओटवणेकर, (८१ वर्ष) श्रीमती सुधा सुरेश सामंत, (७९ वर्ष) श्रीमती सरोजिनी नारायण कुंटे, (८२ वर्ष) सौ. प्रमिला सुरेश नाईक, (७७ वर्ष ) श्रीमती अपर्णा अशोक जोशी,( ७९ वर्ष)

या संपूर्ण उपक्रमासाठी प्रवीण बर्वेकर, शनी सोनावणे, सुवर्णा वायंगणकर, प्रणव प्रभू, आणि बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स