<em>पेंढारी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव..!</em>
शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील पेंढारी पंचकोशी माध्यमिक विद्यालयातील मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
या प्रशालेतील मुक्तीमहिमा गुरव प्रथम क्रमांक शुभम गुरव द्वितीय क्रमांक तन्वी सोमले तृतीय क्रमांक सुविता गुरव चतुर्थ क्रमांक शार्दुल गुरव पाचवा क्रमांक या गुणवंत विद्यार्थ्यांना सोमले काजू उद्योगाचे मालक मिलिंद सोमले यांच्या कडून रोख रुपयांचे बक्षीसे देऊन तसेच मोंड ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक वर्ग व सत्यवान पेंढारकर यांच्या कडून शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष दत्ताराम तिलॉटकर उपाध्यक्ष प्रमोद घाडीगावकर संस्थापदाधिकारी मिलिंद सोमले सत्यपाल लाडगावकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.
यावेळी दताराम तिर्लोटकर डॉ.प्रमोद घाडीगावकर सचिव अनंत गुरव मिलिंद सोमले मुख्यध्यापक अभय सावंत शिक्षकवर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)