<em>राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र संचलित नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट तर्फे चाफेड गावठण येथे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार…!</em>
शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथे शनिवार ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र संचलित नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट तर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
सद्या पावसाळा सुरू असल्यामुळे विविध साथीचे रोग पसरत आहेत. यांना आळा घालण्यासाठी हे आरोग्य पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडे फिरत असून सर्वांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधे दिली जातात.
या नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट तर्फे डॉ. प्रियांका पाटणकर,स्टाफ नर्स युगा ओटवणेकर, फार्मासिस्ट जुगल आजगावकर,लॅब टेक्निशियन रुपेश नाईक, आशा स्वयंसेविका सौ. प्रणिता राणे, माजी सरपंच संतोष साळसकर, उमेश राणे, प्रफुल्ल राणे, ग्रा.प. सदस्य महेश राणे,चंद्रकांत राणे,बंटी राणे आदीसह महिलावर्ग,ग्रामस्थ यांनी याचा लाभ घेतला. ग्रामीण भागात आजही वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. लोकांना वैद्यकीय सेवा घेण्यासाठी खूप त्रासदायक ठरते. गेले ८ दिवस चाफेड गावठण या मार्गावर एस. टी सेवा बंद आहे. तसेच सध्याच्या पावसाळी हंगामात ताप, खोकला,डोकेदुखी,अंगदुखी, विविध अलर्जी अशा आजारांनी लोक हैराण झाले आहेत.त्यामुळे हे आरोग्य पथक गावात येऊन मोफत उपचार आणि मोफत औषधे देत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)