कुडासे येथील विजय फाले यांना पुण्यातील आर्ट बिट्स चा महाराष्ट्र 'युवा कला गौरव पुरस्कार ' जाहीर .
वैभववाडी | नवलराज काळे :
” नकलाकार ” या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस् फाउंडेशन पुणे कडून युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारामुळे मिमिक्री आर्टिस्ट विजय फाले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ म्हणाले की एकूण सहा कला विभागात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात, त्यासाठी १५ मे ते ३१ जुलै दरम्यान महाराष्ट्रातून अनेक कलाकार आपली माहिती पाठवतात. आपल्या कलेचे व्हिडिओ पाठवतात..त्यातून ही निवड करण्यात येते.
आर्ट बिटस् ही संस्था गेली एकवीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला आशा सर्वच कला विभागातील कलाक्षेत्रातील कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने काम करीत आहे.
या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील कलाकारांसाठी महाराष्ट्रातील एक सर्वात मोठा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध दिला आहे. त्यामुळे आपली कला लाखो लोकांपर्यंत पोहचली जाते.
जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त कलाकारांचे तसेच प्राणी पक्षी याचे आवाज काढण्याच सामर्थ्य या कलाकारात आहे आणि तेही गोव्यातील नोकरी इतर बाबी सांभाळत फिल्म लाईन मधेही काम करत हा सगळा आजवरचा प्रवास आहे.. यापूर्वी महाराष्ट्र रत्न तसेच कला क्षेत्रातील पुरस्कार आपल्याला मिळाले.. त्यामुळे हा या संस्थेचा पुरस्कार मिळाल्याने खुप छान वाटल ही फार मोठी उर्जा आपल्यासाठी आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)