ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण मध्ये उद्या पासून पाच दिवशीय मोफत योग, प्राणायाम व ध्यान शिबिर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण मध्ये उद्या पासून पाच दिवशीय मोफत योग, प्राणायाम व ध्यान शिबिर..!

प्रकाशन: 02 Aug 2022 05:26 PM
वाचन संख्या 164

शिरगांव | संतोष साळसकर :
दैवज्ञ हितवर्धक समाज, लायन्स क्लब, व्यापारी संघ, स्नेहल भगिनी मंडळ, महिला पतंजली योग समिती मालवण-सिंधुदुर्गाच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 7 ऑगस्ट पर्यंत पाच दिवशीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दैवज्ञ भवन हाॅल मेढा येथे होणार आहे. 3 तारीखला उद्घाटन सोहळा संध्याकाळी 5 ते 5.30 व 5.30 ते 7 यावेळेत योग शिबिर तसेच 4 ते 6 ऑगस्टला सकाळी 6 ते 8 व संध्याकाळी 5 ते 7 अशा दोन सत्रात तसेच 7 तारीखला संध्याकाळी 5 ते 7 वाजता शिबिर होऊन त्याच दिवशी समारोप सोहळा होणार आहे.


विशेष निमंत्रित मान्यवर म्हणून श्री उमेश नेरुरकर (दैवज्ञ हितवर्धक समाज)श्री.लक्ष्मीकांत खोबरेकर, श्री.सुरेश ठाकूर (बॅ. नाथ पै सेवांगण-मालवण) कल्पना सारंग, वैशाली शानदार(लायन्स क्लब), गणेश प्रभुलकर(व्यापारी संघ), पोलीस उपनिरीक्षक मालवण तसेच श्री. मंदार केणी, मालवण तहसील प्रभारी सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर, पतंजली योग समिती तहसील कार्यकारिणी मालवण व सर्व महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्ग, सौ. नर्मदा पटेल जिल्हा प्रभारी, सौ तृप्ती तोरस्कर कोषाध्यक्ष, सौ.रश्मी आंगणे महामंत्री सौ. खाडीलकर , संघटन मंत्री, प्रणाली मराठे संघटनमंत्री, श्वेता गावडे युवती प्रभारी ,सौ.वर्षा गावकर सावंतवाडी तहसील प्रभारी, सौ प्रिया कोचरेकर योगशिक्षक कणकवली, श्री.रुजारीओ पिंटो, निवासी तहसीलदार, तहसीलदार, श्री.अजय पाटणे, सर्व मिडिया व पत्रकार बंधू, दिवानी न्यायाधीश मालवण, मुख्यकार्यकारी अधिकारी मालवण, विधिज्ञ तालुका बार असोसिएशन मालवण पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत. आपल्या जीवनाला निरोगी व सर्वांग सुंदर ठेवण्यासाठी तसेच योगाचा प्रचार व प्रसार व्हावा व ह्या राष्ट्रधर्म कार्या विषयी जनजागृती होऊन संपूर्ण समाज आरोग्य संपन्न व्हावा हा या शिबिरामागचा मूळ उद्देश आहे. या शिबिराचा बालक, युवक, युवती, महिला, पुरुष तसेच सर्व वयोगटातील साधकानी लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी तहसील प्रभारी
सौ.वर्षाराणी बलवंत अभ्यंकर-९४०३५६२६५२, ऋतुजा केळकर-९४२०४२३७९०, अर्चना हर्डीकर-९४२०२१०७५९, खाडिलकर-९४०५७५२६५९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन या समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स