<em>चिंदर रवळनाथ मंदिर येथे आज सात प्रहराचा हरिनाम सप्ताह.</em>
चिंदर | विवेक परब :
मालवण तालुक्यातील चिंदर रवळनाथ मंदिर आज येथे हरिनाम सप्ताह सुरु झाला. सकाळी पुजा अर्चे नंतर श्री देव रामेश्वराचे वाजत गाजत रवनाथ मंदिर येथे आगमन झाले हा सुवर्ण योग वर्षातून एकदाच असतो. दिवस आणि रात्रभर चालणाऱ्या या सप्ताहात गावातील भजन मंडळांचा सहभाग असतो. भावीक भक्तांची दर्शनासाठी यावेळी खूप गर्दी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात प्रहरा नंतर हरिनाम सप्ताहाची महाप्रसादाने सांगता होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)