ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माध्यमिक विद्यामंदिर साळशी प्रशालेत लोकमान्य टिळक यांचा पुण्यतिथी कार्यक्रम साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माध्यमिक विद्यामंदिर साळशी प्रशालेत लोकमान्य टिळक यांचा पुण्यतिथी कार्यक्रम साजरा.

प्रकाशन: 01 Aug 2022 05:27 PM
वाचन संख्या 92

शिरगांव / संतोष साळसकर :

देवगड तालुक्यातील साळशी येथील माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेत लो‌.टिळक पुण्यतिथी निमित्त विद्यार्थी कथाकथन स्पर्धा उत्साहात पार पडली.यानिमित या हायस्कूल चे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांच्या सुविद्य पत्नी सौ. ‌समिधा माणिक वंजारे, प्र.मुख्या., शिरगाव इंग्लिश मिडियम स्कूल यांनी थोडी फार ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने मोफत दिलेल्या २४ डझन फुलस्केप वह्यांचे, हायस्कूल च्या सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.


या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीस्कूल कमिटी सदस्य
तथा माजी उपसरपंच राजेंद्र साटम व प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक ‌माणिक वंजारे, यांनी स्विकारले.अध्यक्षांच्या हस्ते लो. टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सौ.समिधा माणिक वंजारे यांनी वह्यांच्या स्वरुपात केलेल्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.यावेळी स्वप्नील भरणकर, सदाशिव भिसे उपस्थित होते.
यावेळी संजय मराठे व पुरुषोत्तम साटम या शिक्षकांनी आपले विचार मांडले. सुमन लब्धे , वी ह्या विद्यार्थ्यीनीने सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन मानसी लाड,इ. १० वी हिने मानले. या सर्व कार्यक्रमासाठी पुरुषोत्तम साटम यांचे मार्गदर्शन लाभले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स