ओटव नांदगांव शाळेच्या विद्यार्थ्यांची हुतात्मा स्मारकास भेट..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने ओटव नांदगांव शाळेच्या विद्यार्थ्यांनी करुळ येथील हुतात्मा स्मारकास भेट देत माहिती जाणून घेतली. हुतात्मा स्मारका बद्दल शिक्षक राजेंद्र सावंत व मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी ज्ञान प्रबोधिनी शाळा करुळचे मुख्याध्यापक श्री.रामचंद्र नारकर,शिक्षक श्री.राजेंद्र सावंत,केंद्रप्रमुख श्री.संतोष जाधव,मुख्याध्यापक श्री.आनंद तांबे,सहशिक्षिका रुपाली हुन्नरे आदी उपस्थित होते. ओटव नांदगाव प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. शाळा व्यवस्थापन समितीनेसुद्धा शिक्षकानी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)