ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>चाफेड गावठण मार्गे भोगलेवाडी फाट्या पर्यंत एस्. टी वाहतूक गेले चार दिवस बंद ; ग्रामस्थांनी श्रमदानाने खड्डे बुजविले .</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>चाफेड गावठण मार्गे भोगलेवाडी फाट्या पर्यंत एस्. टी वाहतूक गेले चार दिवस बंद ; ग्रामस्थांनी श्रमदानाने खड्डे बुजविले .</em>

प्रकाशन: 01 Aug 2022 02:57 PM
वाचन संख्या 244

गणेशोत्सव सण जवळ आल्याने तात्काळ एस्. टी सेवा सुरू करावी अशी ग्रामस्थांची मागणी .

शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील चाफेड गावठण मार्गे भोगलेवाडी पर्यंतच्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने गेले चार दिवस या मार्गावरची एस्. टी वाहतूक बंद झाल्याने सद्या ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी एकत्रित येऊन हे खड्डे बुजविले.
गेली अनेक वर्षे चाफेड गावठणवासियांतर्फ श्रमदान केले जाते. या मार्गावर पूर्णतः डांबरीकरण व्हावे अशी येथील ग्रामस्थांनी एकमुखी मागणी होती. मात्र या मार्गावर काही अंतरावर कमी प्रमाणात डांबरीकरण होते आणि पुढच्या वर्षी ते पावसाळ्यात धुपून जाते. सद्या या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
अवघ्या महिनाभरात गणपती बाप्पांचे आगमन होणार असून या गणेशोत्सवात एस्. टी वाहतूक सुरळीतपणे चालू रहावी यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन श्रमदानाने खड्डे बुजविले. संबधित खाते किंवा कोणीही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे सुर उमटत आहेत.
दरम्यान भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम आणि माजी जि. प. सदस्य सुभाष नार्वेकर यांनी बोलताना सांगितले की पुढच्या वर्षी हा संपूर्ण रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत घेण्यात येणार असून तसे आमचे पर्यंत देखील चालू आहेत. असे सांगितले.मात्र सद्या येथील ग्रामस्थांना एस्. टी बंद झाल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. सद्या ग्रामस्थांना शिरगांव येथील आठवडी बाजाराला जाण्यासाठी सुमारे ५ कि. मी. अंतर पायी चालत साळशी ला जावे लागत आहे.त्यामुळे शालेय विद्यार्थी,वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुले यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सव काळात तर बाजार रहाट आणण्यासाठी ग्रामस्थांना अक्षरशः मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे. तरी या मार्गावरील ग्रामस्थांनी खड्डे बुजविल्याने आता तरी एस्. टी महामंडळाने एस्. टी सेवा सुरू करावी अशी आग्रही मागणी होत आहे.
या श्रमदानाला ग्रा. प. सदस्य महेश राणे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रवीण राणे,शाखाप्रमुख उदय राणे,प्रकाश मोंडकर,सचिन मोंडकर,प्रदीप घाडी,अनंत घाडी,चंद्रकांत मोंडकर,हर्षद राणे,उमेश राणे आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स