<em>मूळचे देवगड तालुक्यातील गिर्ये गावचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश उदय लळीत हे पुढील महिन्यात सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार.</em>
समस्त सिंधुदुर्गवासियांसाठी ही आनंदाची गोष्ट.
शिरगांव | संतोष साळसकर :
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश श्री. उदय उमेश लळीत हे पुढील महिन्यापासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ते मूळचे तालूका – देवगड ( गिर्ये – गांव ) विजयदुर्ग विभागाचे असून त्यांचा जन्म मुंबई येथील गिरगावातील आंग्रेवाडी. येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कुल मध्ये मराठी माध्यमातून झाले आहे. आदरणीय उदय उमेश लळीत यांचे समस्त सिंधुदुर्गकरांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व त्यांना यशस्वी आणि उज्ज्वल भावी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)