बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे होणारे योग शिबिर दैवज्ञ भवन हाॅल मध्ये होणार…!
कार्यक्रमाच्या जागेत बदल….
विवेक परब |एडिटोरिअल असिस्टंट :
बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण व सिंधुदुर्ग, महिला पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 7 ऑगस्ट पर्यंत पाच दिवशीय योग शिबिराचे आयोजन बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे करण्यात येणार होते काही कारणास्तव कार्यक्रमाच्या जागेत बदल करुन हे शिबिर दैवज्ञ भवन हाॅल मेढा येथे होणार आहे. 3 तारीखला उद्घाटन सोहळा संध्याकाळी 5 ते 5.30 व 5.30 ते 7 यावेळेत योग शिबिर तसेच 4 ते 6 ऑगस्टला सकाळी 6 ते 8 व संध्याकाळी 5 ते 7 अशा दोन सत्रात तसेच 7 तारीखला संध्याकाळी 5 ते 7 वाजता शिबिर होऊन त्याच दिवशी समारोप सोहळा होणार आहे.
सहराज्य प्रभारी रमाताई जोग, जिल्हा प्रभारी नर्मदा पटेल, जिल्हा महामंत्री रश्मी अंगणे, जिल्हा कोषाध्यक्ष तृप्ती तोरस्कर, जिल्हा संघटन मंत्री दिपश्री खाडिलकर, जिल्हा संघटनमंत्री प्रणाली मराठे, जिल्हा युवती प्रभारी श्वेता गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष वर्षा गावकर, संपर्क प्रमुख व तहसील प्रभारी वर्षाराणी अभ्यंकर मालवण, प्रियाताई कोचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत. आपल्या जीवनाला निरोगी व सर्वांग सुंदर ठेवण्यासाठी तसेच योगाचा प्रचार व प्रसार व्हावा व ह्या राष्ट्रधर्म कार्या विषयी जनजागृती होऊन संपूर्ण समाज आरोग्य संपन्न व्हावा हा या शिबिरामागचा मूळ उद्देश आहे. या शिबिराला बालक, युवक, युवती, महिला, पुरुष तसेच सर्व वयोगटातील साधकांनी याचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी तहसील प्रभारी
सौ.वर्षाराणी बलवंत अभ्यंकर-९४०३५६२६५२, ऋतुजा केळकर-९४२०४२३७९०, अर्चना हर्डीकर-९४२०२१०७५९, शिल्पा परब-खोत-९३२६४७७७०७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन या समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)